Wednesday, 26 March 2014

तन्मय


तळं कसं शांत .....
प्रकाशात चमचमणारं,
वाऱ्याच्या झुळकेनी कळेल न कळेलसे हेलकावणारं
तळं कसं प्रौढ समंजस
तळ्याच्या तळाशी काहीतरी घडतंय 
उमलतंय, मावळतंय, रुचतंय, खुपतंय,
सतत काहीतरी बदलतंय.
तळं मात्र तरीही शांतच...
मग येतो मुसळधार पाऊस.
तळ्याला अलिप्त राहूच देत नाही.
… आता तळ्याचा तळ, तळं आणि पाऊस सारंच एकरूप .
--वृंदा टिळक 

(शब्दगंध सिंगापूर ह्या पुस्तकात प्रकाशित )

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...