Wednesday, 26 March 2014

ती..


तशी ती जगाचीच तर असते.
पण कधी अवचित गवसतो तिला एक काळाचा तुकडा, स्वत:साठी..स्वत:तच असायला
उन्हाचे कवडसे मांडतात तेव्हा रिमझिम चा खेळ
तरंगत खाली येणाऱ्या पानात झुलू लागतात वेल
जमिनीवर पडलेल्या पिवळ्या तांबुस पानांना मग चढते सोनकळा
पायाखाली चुरल्या जाणाऱ्या वाळक्या पानांतही फुलतो केशर मळा
अलगद उकलत जातात गाठी एकेक
निवळशंख मनात आता सारेच सुक्षेम
अनुभवत ,आनंदत रहाते ती स्वत:च्याच सहवासात
अशा दुर्मिळ,अनोख्या क्षणांच्या कृतज्ञ स्वीकारात
मग कधीतरी भरतेच एकदा ती घटिका
औटघटकेचा डाव सारा होतो फिकाफ़िका
बांधून गाठोड्यात स्वत:ला घट्ट करकचुन
एका संदुकीत ठेवून टाकते कुलूप लावुन
किल्ली भिरकावते पार सप्तपाताळात
होते सज्ज जगायला नेहमीच्या जगात
बनून जाते ती त्या जगातली,त्या जगाचीच
तशी ती जगाचीच तर असते ......
--वृंदा टिळक 

(शब्दगंध सिंगापूर ह्या पुस्तकात प्रकाशित )

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...