अंधार उजळतोय की प्रकाश मालवतोय?
ते गूढ मंदिर दृष्टिक्षेपात येऊ लागलेय.
त्याचा रंग,आकार अजूनही अज्ञातच..
पायरीगणिक जगणे ओघळून जाते आहे.
सत्याच्या थारोळ्यात तडफडतेय गतआयुष्य .
क्षीण नजर आता त्या मंदिराचा वेध घेऊ पाहते आहे..
नजरेत तरळतात सुर्हुदांचे चेहरे.
क्षणभर धुके झाकोळते.
पण मोह झटकून परत नजर एकाग्र करण्याचा प्रयत्न ....
विकलांग शरीर आता अगदी वरच्या पायरीवर
पायऱ्या स्थिर, मंदिर वर्तुळाकार गतीत अविरत फिरणारे
मंदिराचा दरवाजा समोर येईल त्या क्षणी पायरीवरून मंदिरात झेप घेणे जमेल का?.. जमेल ना?
… एका निश्चिताविषयीची अनिश्चितता भयकातर करणारी...
-वृंदा टिळक.
(रश्मिन -दिवाळी अंक २०१२ )
No comments:
Post a Comment