कविता दिन .. मनःपूर्वक शुभेच्छा!!
कविता तर असतेच प्रत्येकाच्या मनात..ह्या निमित्ताने पुन्हा एकदा तिची आठवण.
प्रत्येक फोटोमागे एक कहाणी असते...कधी कधी फोटो नंतर देखील असते. काल फोटो पोस्ट केल्या केल्या हिंदी चांगले जाणणारी माझी मैत्रीण पल्लवी गोरे हिने निरोप पाठवला..'नील मे तैरता सुर्ख फुल, सुर्ख नील' .. त्या ओळीतील लय मनात गुंजत राहिली..आणि हिंदी भाषेचे वैभव देखील..
महाशिवरात्र - २०२६ जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...