कविता दिन .. मनःपूर्वक शुभेच्छा!!
कविता तर असतेच प्रत्येकाच्या मनात..ह्या निमित्ताने पुन्हा एकदा तिची आठवण.
मी रेलून उभी आहे कवितेवर
आयुष्यभराचा भार टाकून
ती आहे सतत. . . माझ्याबरोबर
आणि आता ती आणि मी यातील सीमारेषाच नामशेष.
कवितेच्या आधीची मी कशी होते, आठवत नाही.
त्या आधी मी होते का??? मी 'मीच' होते का?
- वृंदा टिळक
No comments:
Post a Comment