नवीन फुलली
फुले कितीतरी
निळी जांभळी
निळ्या जळातून
नभ नील माया
अशी सांडली
पाहण्या थांबला
रमे दिनमणी
सांज लांबली
क्षण मंतरता
हृदये आता
गंध भारली
- वृंदा टिळक
12/04/22
P.C. Janhavi Tembe Kulkarni

महाशिवरात्र - २०२६ जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...
No comments:
Post a Comment