Wednesday, 26 March 2014

संभ्रम


उजळत चाललीये पहाट
तिला प्राप्य असणारा तारा चमकतोय अजूनही आकाशात.
आता उशीर करुन नाहीच चालायचं,
दार उघडुन ती बाहेर पाऊल टाकते.
अंगणात पारिजातक बहरलाय..
नाजुक आरक्त फुलांचा सडा शिंपलाय.
पाऊल टाकायचे म्हटले तर टाकावे तरी कुठे?
तारा मिळवावा तर प्राजक्त चुरगाळतोय,
प्राजक्त जपावा तर तारा अस्पष्ट होत जातोय.
अम्लान प्राजक्त की चमचमणारा तारा?
संभ्रांत मनावर छायाप्रकाशाचा पहारा!
-वृंदा टिळक 

(शब्दगंध सिंगापूर ह्या पुस्तकात प्रकाशित )

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...