काल आपण शब्द, नृत्य, नृत्यनाट्य, शिल्प ह्यातून दिसणारी रामकथा पहिली. आज पाहणार आहोत, चित्रातून दिसणारी रामकथा.
रामकथा चित्रांचा विषय झालेली अनेक देशात दिसून येते. मला विशेष करून आठवतायत ती कंबोडियात मिळणारी, राईस पेपरवर एम्बॉस करून तयार केलेली रामकथेतील चित्रे.
भारतातील प्रत्येक चित्रशैली मध्ये केलेली राम कथा आपल्याला बघायला मिळते.चित्रकूट येथील शिल्प चित्रमय रामदर्शन प्रसिद्ध आहे. राजा रविवर्मा ह्यांनी केलेले राम पंचायतन आणि त्यातली महाराष्ट्रीयन पद्धतीची सीतेची साडी आपल्या सगळ्यांना आठवत असेलच.
काही वर्षांपूर्वी आई -सुशील अभ्यंकर, सिंगापूरला आली होती, तेव्हा रामनवमीच्या निमित्ताने रामायणावर तिचे व्याख्यान झाले होते.
आमचे स्नेही, चित्रकार श्रीरंग केळकर ह्यांनी श्रीरामाचे समयोचित असे उत्तम चित्र काढून तिला भेट दिले होते.
ते अजूनही तिच्या खोलीत लावलेले आहे. इतकेच नव्हे तर आज अयोध्या राम मंदिर भूमिपूजन निमित्ताने त्याच चित्रासमोर तिने रामरक्षा म्हटली. आज भूमी पुजना पर्यंत तिचा श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा 10000 जप पण करून झाला होता. (तसे तिचे वय काही फार नाही..अवघे 91 वर्षे. इतकी तरुण असल्यानेच ती जे ठरवते ते जिद्दीने पूर्ण करू शकते!)
#जयश्रीराम #JaiShreeram



No comments:
Post a Comment