मागणे
द्वेष जळू दे ....स्वार्थ झडू दे
मैत्र नित राहो .. मनी.. मैत्र नित राहो
मम मानसी करुणेचा वास नित्य राहो ||
दंभ गळू दे..... गर्व सरु दे
शांती नित लाभो.. मना.. शांती नित लाभो
मम मानसा सौहार्दाचा स्पर्श अक्षर लाभो||
दुःख येऊ दे.... चिंता असू दे
ना चढो काजळी..मना.. ना चढो काजळी
मानसी निर्मल प्रकाश पसरो त्या त्या हर वेळी ||
शुद्ध राहू दे.... शुभ्र असू दे
क्षमा शील होवो.. मन.. क्षमा शील होवो
मम मानसी दृढ निश्चय हा अक्षय जागा राहो||
No comments:
Post a Comment