Saturday, 13 August 2022

गाऊ या जय गान|

भेदभाव मावळती सगळे
सन्मानाची ज्योत पाजळे
बंधुभाव अन ऐक्याचा सारे जपू सन्मान
उच्च स्वराने, अभिमानाने गाऊ या जय गान||

कोणी न राहो येथे वंचित
सत्कर्म भावना अमुचे संचित
संस्कृती अन् परंपरांचा आम्हा असे अभिमान
उच्च स्वराने, अभिमानाने आता गाऊ जय गान||

उत्साहाने प्रेरित हो तन
आकांक्षानी भारित हो मन
दृढ विश्वासाने सिद्ध करू या देशाचे यशोगान
उच्च स्वराने, अभिमानाने आता गाऊ जय गान||

अमृत योग हा करू साजरा
संकल्पाचा दिन आज खरा
उज्वल उन्नत उदात्ततेचे आम्हा असे वरदान
उच्च स्वराने, अभिमानाने आता गाऊ जय गान||
(स्वाधीनता अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला)













No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...