हर घर तिरंगा!!
भारतापासून हजारो किलोमीटर दूर, अगदी जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेली, उंचच उंच पर्वतांनी वेढलेली योसेमिटी व्हॅली..तशी दुर्गमच म्हणायला हवी.
आजच्या भाषेत समजावून सांगायचे तर तिथे फोन नेटवर्क पण अधूनमधून आणि अगदी एकदोनच रेघ मिळते. (आता सगळ्यांना नीट कळेल किती दुर्गम ते!! )टी. व्ही. तर नव्हताच. पण व्हाट्सअँप जेव्हा जेव्हा पाहायला मिळाले तेव्हा तेव्हा तिरंग्याचे फोटो पाहायला मिळत होते.
अमृतमहोत्सवाच्या दिवशी आपल्याला तिरंगा पाहायला मिळाला तर किती चांगले होईल असे सारखे वाटत होते. पण तशी काही शक्यताच नव्हती.
आणि एका रस्त्याने जाताना अचानक मुलांना एका घरावर लावलेला तिरंगा दिसला. ज्या गावात अजून आम्हाला फारश्या रेसिडेन्शिअल बिल्डिंगच दिसल्या नव्हत्या तिथे एक घर दिसणे, त्यावर तिरंगा फडकताना दिसणे.. काय वाटले ते नीटसे शब्दांत नाही वर्णन करता येत. अवर्णनीय आश्चर्य,आनंद, अभिमान, कृतज्ञता.. असे सगळे सगळे. वंदे मातरम! भारतमाता की जय!
“And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
― Paulo Coelho, The Alchemist
(कोणाच्या घराची बेल वाजवायला ती योग्य वेळ नव्हती.. त्यामुळे घर कोणाचे होते कळले नाही. )

No comments:
Post a Comment