Sunday, 9 October 2022

प्रार्थना

प्रार्थना
तुझे तेज अंगी
यावे जरी शतांशे
ही आस मनी असे
हे भास्करा..
असो उदय वा अस्त
तमा न मुळी तुजसी
कर्म करीत राहसी
हे विरोचना
न होवो मलाही
बाधा कधी स्तुतीची
न वाटो खंत निंदेची
हे मित्रा ..
कण कण क्षण क्षण
सुकृतालागी वेचावा
हा जन्म सार्थ व्हावा
हे सूर्या
- वृंदा टिळक
- ९/१०/२२

P.C. Hrushikesh Tilak

माओइ - हवाई 

 

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...