Wednesday, 16 February 2022

आजचा दिवस.

 आजचा दिवस...

असा एखादा दिवस येतो
सकाळ होताच पाऊस येतो
थंडगार वारा मनाला ताजं करून जातो

असा एखादा दिवस येतो
ज्याच्या पायात नसतात कोणत्याच बेड्या
फुलांच्या, झाडांच्या, नद्यांच्या गोष्टी आठवतात मग थोड्या

असा एखाद्या दिवस येतो
जेव्हा वाचलेल्या कविता मनाला भिडतात
शब्दांचे अर्थ मनात खोलवर उतरतात

असा एखादा दिवस येतो
मन खेळतं झिम्मा होऊन प्रसन्न सावळं
क्षणोक्षणी होत राहतं अजूनच कोवळं

असा एखादा दिवस येतो
मन होऊन जातं पूर्ण जगलेलं शहाणं हलकं पान
वार्यासोबत उंच उडत, शिवून येतं आकाशाची कमान
- वृंदा
दिनांक 16/02/ 22

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...