आली आमच्या घरी दिवाळी - रोज एक पोस्ट -दिवाळीची गोष्ट २
ह्या फोटोत आहे, खादी नॅचरल चंदन मसाज ऑइल, Amruta Ayurved Panchkarma Center चे आयुर्वेदिक सुगंधी उटणे आणि The Earthen Lather चा १०० % व्हीगन साबण
खादी नॅचरल चंदन, अप्रतिम सुगंध. ग्रामोदय आश्रमाची निर्मिती. प्रिय सखीने भेट दिलेले असल्याने त्याला मैत्रीचा सुगंध पण येतोच आहे.
आयुर्वेदिक सुगंधी उटणे, अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर चे. अमृता आणि आनंद कुलकर्णी हे तरुण उत्साही डॉक्टर्स आपल्या क्लिनिक सोबतच अशी अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार करीत आहेत.
वैशाली, चैतन्य ने भेट दिलेले साबण १०० टक्के व्हीगन! The Earthen Lather च्या अनुराग आणि देविका चिटणीस ह्यांनी व्हीगन साबणांचे अनेक प्रकार तयार केले आहेत. त्या साबणाचे रूप इतके सुंदर आहे की आधी त्यांचे मनसोक्त फोटो काढून ठेवले आहेत. आता आज साबणाचा शुभारंभ केला!! फोटोत हिरवा दिसणारा साबण Aloe Vera चा, त्यात मिंट पण असल्याने एकदम थंडा थंडा कुल कुल चा अनुभव!!
आणि पाच वर्षांपूर्वी मुग्धाने स्वतः रंगवून दिलेल्या सुंदर पणत्या .. दर दिवाळीत वापरते!
एरवी नेहमीसारखे सगळे चालू असले की आपल्याला काहीतरी बदल हवा असतो. हे वर्षच वेगळे होते, दिवाळी देखील वेगळीच. तर ती नेहमीसारखी आहे असे स्वतःला वाटायला लावण्याचे सगळे प्रयत्न आपण सगळेच करतो आहोत! असो.
तर मी सांगत होते गोष्ट स्थानिक वस्तू वापरण्याची. तर त्यातले उटणे आणि साबण अगदी आमच्या ठाण्यातच तयार झालेला आहे हो!
तुम्ही सगळे पण नक्की तुमच्या परिसरात तयार होणाऱ्या वस्तू शोधत असाल. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देत असाल ह्याची खात्री आहेच. अवघे धरु सुपंथ.. ठरलेच आहे आपले!!.





No comments:
Post a Comment